Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'संत गजानन' अभियांत्रीकीमध्ये हसुरसासगिरीच्या शांताबाई यादव यांचा सत्कार

महागाव : संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शांताबाई यादव यांचा सत्कार करताना डॉ. शीतल भिडे व इतर मान्यवर. 



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 'बेटी बचाओ' या अभियानाअंतर्गत पहिल्या भारतीय नाभिक महिला म्हणून सन्मान मिळालेल्या गडहिंग्लज तालुक्यातील हसुरसासगिरी येथील श्रीमती शांताबाई यादव हिचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दंतरोग तज्ञ डॉ. शीतल भिडे या होत्या.




स्वागत प्राचार्य डॉ. संजय सावंत यांनी तर प्रास्ताविक प्रा. अचला नारायणकर यांनी केले यावेळी डॉ. भिडे यांनी माईंड मेटरस या विषयावर माहिती दिली. प्रा. अतुल देशपांडे यांनी शांताबाई यादव यांच्या जीवनातील प्रसंग कथन करीत त्यांच्यावर आधारित चित्रफिती दाखवली दरम्यान नाटक व वेशभूषा स्पर्धेतील तेजस्विनी बिलावर, गीता पाटील,प्रणाली इंगवले, मानसी गणाचार्य, सानिका मयेकर, सानिका भाट या विजयी स्पर्धकांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आला. यावेळी प्रा.एस.बी.पवार प्रा. एस.टी.माटले, प्रा. अमरसिंह फराक्टे, प्रा आर.एस. देसाई, सह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.