Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कृष्णाई अकॅडमीच्या आराधना आरबोळेची वनरक्षकपदी निवड

 औरनाळ येथे करण्यात आला सत्कार





गडहिंग्लज (प्रतिनिधी): औरनाळ (ता. गडहिंग्ल) येथील कृष्णाई भरतीपूर्व प्रशिक्षण सामाजिक अकॅडमीची प्रशिक्ष‌णार्थी आराधना आरबोळे हिची यवतमाळ या ठिकाणी वनरक्षकपदी  निवड झाली आहे. यानिमित्त अकॅडमीच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. 



स्वागत व प्रास्ताविक संपत सावंत यांनी केले. अकॅडमीचे अध्यक्ष प्रा. श्रीपती सावंत यांच्या हस्ते आराधना आरबोळे हिचा सत्कार करण्यात आला. तसेच माध्यमिक पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्‌दल विनायक नाईक व अनिल पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.




अत्यंत माफक फीमध्ये साईनगर शेंद्रीमाळ येथे सुरु असलेल्या अकॅडमीचे जवळजवळ ४७ प्रशिक्षणार्थी सैन्य पोलीस, वनखाते ठिकाणी सेवा बजावित असल्याचे प्रा. श्रीपती सावंत यांनी सांगितले. आराधना आरबोळे, सतीश रेडेकर, विक्रांत गुरव, अनिल पाटील, विनायक नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. सचीन कांबळे यांनी आभार मानले. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.