Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुक्यात दहावी परीक्षेला प्रारंभ

तालुक्यातील दहा केंद्रांवर परीक्षा सुरू


कॉपीमुक्त परीक्षेसाठी केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त, भरारी पथकांची स्थापना 




हलकर्णी : दहावी परीक्षेसाठी तालुक्यातील हलकर्णी केंद्रावर सकाळी साडेनऊच्या दरम्यान विद्यार्थी व पालकांनी केंद्राबाहेर गर्दी केली होती.

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
इयत्ता दहावी परीक्षेला आज सकाळ पासून प्रारंभ झाला. गडहिंग्लज तालुक्यात एकूण दहा केंद्रांवर ही परीक्षा सुरू आहे. या केंद्रांवर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र बाहेर सकाळी विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली होती. कडक बंदोबस्तात परीक्षेला प्रारंभ झाला आहे. सर्व केंद्रांवर विद्यार्थी व शिक्षकांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. पोलीस व होमगार्ड यांनी केंद्र परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.



 


गडहिंग्लज तालुक्यातील दहा केंद्रांवरून मराठी माध्यमाचे २५९२ तर उर्दू माध्यमाचे ४७ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. तालुक्यातील बटकनंगले, जागृती-गडहिंग्लज, गडहिंग्लज हायस्कूल, हलकर्णी, महागाव, नूल, नेसरी, मुंगुरवाडी, कौलगे, साधना-गडहिंग्लज या दहा केंद्रांवर परीक्षा सुरू झाली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठे पथक व भरारी पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, विस्तार अधिकारी आर. आर. कोरवी यांनी दिली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.