हलकर्णी (वार्ताहर) : बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
सरपंच भारती रायमाने, उपसरपंच बसवराज कापसे, वैद्यकीय अधिकारी नीलिमा धबाले, ॲड. शंकराव धबाले, पत्रकार अमानुला मालदार, ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, हिंदी-मराठी गीते, नाट्य, समुह नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली.
यावेळी मधुकर येसणे, अनिल बागडी, अयाज बागवान, उज्वल कुंभार, सूर्यकांत चौगुले, अरुण दड्डीकर, सतीश तेली ,भरत पाटील, एस.एम. नाईक, राजेंद्र नाईक, श्रीधर पाटील, सुनील सुरंगे, सागर शिंदे, संभाजी चौगुले, मेघा चौगुले, भागोजी कागीनकर, आनंदा नागंनुरे, विजय शिखरी, प्रताप चव्हाण, कावणेकर, अर्जुन चौगुले यांच्यासह विविध संस्थांचे, तरुण मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.





