Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंगुरवाडी येथे ब्रह्माकुमारी विद्यालयाला डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्याकडून स्वखर्चाने कुपनलिक



हलकर्णी (वार्ताहर) : मुगुंरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील कमल मोरे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ  ब्रह्माकुमारी विद्यालयाला दिलेल्या वीस गुंठे जागेत जलदूत, समाजरत्न डॉ गंगाधर व्हसकोटी यांनी स्वखर्चाने कुपनलिका खोदून दिली आहे. या कुपनलिकेला मुबलक पाणी लागले आहे. डॉ. व्हसकोटी यांच्या या समाज कार्याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.



                         

या कूपनलिकेचे पूजन माजी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई  हत्तरकी,डॉ  गंगाधर व्हसकोटी यांच्या हस्ते करण्यात आले. ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या संचालिका विना बहन यांच्या हस्ते डॉ. गंगाधर व्हसकोटी यांचा सत्कार करण्यात आला. रेखाताई हत्तरकी यांचा सत्कार महादेवी बहन यांच्या हस्ते करण्यात आला.



                                                      


यावेळी ब्रह्माकुमारी विद्यालय हलकर्णीच्या संचालिका महादेवी बहन, गीता बहन, दड्डी सेवा केंद्र संचालिका विना बहन, तेगीनहाळ उपसरपंच मनोज जाधव, शरदचंद्र अबुलकर, मीनाक्षी बसापुरे, मल्लिकार्जुन हत्तरकी, तानाजी पाटील, अजित पाटील, रामगोंड  पाटील, प्रकाश घाटग्यानावर,  ब्रह्माकुमारी विद्यालयाचे सर्व मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.