Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचे ध्येय ठेऊन वाटचाल करावी!

ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या विद्यार्थिनी विशाखा कुराडे यांचे आवाहन


गडहिंग्लजला शिवराज महाविद्यालयात बी. एस्सी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ






गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचे ध्येय ठेऊन वाटचाल करावी. खरेतर उच्च शिक्षण आजच्या घडीला महत्वाचे आहे. उच्च शिक्षणातून आपल्या करिअरला खरा टर्निंग पॉईंट मिळत असतो. आपल्या जीवनात आपण यशस्वी होण्यासाठी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन स्वॅन्शी विद्यापीठ ऑस्ट्रेलियाच्या विद्यार्थिनी व शिवराजच्या माजी विद्यार्थिनी विशाखा अनिलराव कुराडे यांनी केले.




गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात बी. एस्सी तृतीय वर्षाच्या शुभेच्छा समारंभात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. संस्थेचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, डॉ. सुधीर मुंज, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्वागत व प्रास्ताविक डॉ.अल्ताफहुसेन नाईकवाडे यांनी केले.




या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विशाखा कुराडे म्हणाल्या,  विदेशात खूप संधी आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य ठेऊन आपल्या ध्येयपूर्तीसाठी कष्ट घेणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी परदेशी शिक्षण, व्यवस्था, आधुनिक संशोधन, तेथील न्यायव्यवस्था, उच्च शिक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शिवाय परदेशातील अनुभव कथन केले.




यावेळी संस्था सचिव डॉ. अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एम. हसूरे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मयूर केसरकर, प्रवीण चव्हाण, मृदुला भालेकर, गायत्री कांबळे, श्वेता देसाई  या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. विक्रम शिंदे, प्रा. राखी भोसले, प्राध्यापक यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार डॉ. प्रवीण डोंगरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.