Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चंदगडमध्ये ठाकरे पक्ष शिवसेनेने जपले हिंदू- मुस्लिम बंधूभाव

इफ्तार पार्टीचे आयोजन करत मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा





चंदगड : चंदगड तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने चंदगड येथील आजाद नगर येथील फातिमा मशीद येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणून मानला जाणारा रमजान ईद ११ एप्रिल रोजी आहे. या निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून दररोज रोजा (उपवास) धरला जातो. या निमित्ताने एकमेकांप्रती बंधूभाव  व एकात्मता टिकून राहावी यासाठी शिवसेनेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीने मुस्लिम बांधवांनी सायंकाळी उपवास सोडला. या इफ्तार पार्टीचे आयोजन करत शिवसेनेने हिंदू-मुस्लिम ऐक्य जपले.





या इफ्तार पार्टीचे आयोजन  शिवसेनेचे चंदगड शहर प्रमुख  मोहसीन पटेकरी यांनी केले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर, चंदगड तालुका संघटक विक्रम मुतकेकर, आजरा तालुकाप्रमुख युवराज पवार, गडहिंग्लज तालुका प्रमुख अजित खोत, युवासेना तालुका अधिकारी किरण नागुर्डेकर, उपतालुकाप्रमुख उदय मंडलिक यल्लाप्पा मुतकेकर, वसंत नाईक, मुस्लिम समाज अध्यक्ष अल्लाबक्ष  मदार, अशपाक नाईकवडी, चंदगड शहर प्रमुख मोहसीन पटेकरी, शहर संघटक वाईद पाचापुरे, उपशहर प्रमुख साकीब शहा, वाहतूक सेना तालुका प्रमुख महेश पाटील, विभाग प्रमुख मोनापा चौगुले, गडहिंग्लज शहरप्रमुख संतोष चिकोडे , महादेव गावडे, महादेव गुरव, अखलाकभाई मुजावर, सत्तार शहा, गुंडोपंत वाके, आलाव सय्यद, हारूण सय्यद, नासिर मुल्ला, आली मुल्ला, सलावं सय्यद, कुदरत मुल्ला, रफिक मदार यांच्यासह मुस्लिम बांधव व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.