Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माजी आमदार स्व. श्रीपतराव शिंदे यांची उणीव जनता दलाच्या कार्यकर्त्यांना कधीच भासू देणार जाणार नाही!

आमदार सतेज पाटील यांची जनता दलाच्या नेत्या प्रा. सौ. स्वाती कोरी यांना ग्वाही 


माजी नगराध्यक्षा प्रा. सौ. स्वाती कोरी यांनी घेतली आमदार सतेज पाटील यांची भेट 


आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित काम करण्याचा निर्णय

    




कोल्हापूर :  माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांची उणीव कधीच भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. काल गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा प्रा. सौ. स्वाती कोरी यांच्यासह गडहिंग्लज चंदगड, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील जनता दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित काम करण्यासाठी भेट घेतली, यावेळी ते बोलत होते. येथून पुढे सर्वजण एकत्रित मिळून कायमस्वरूपी काम करूया, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. 




देशाची घटना बदलण्यासाठी भाजपाकडून ४०० पारचा नारा दिला जात आहे. त्यामुळे त्यांचा तीन चतुर्थांश बहुमताचा अट्टाहास सुरू असल्याचा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केला. आतापर्यंत आमचा वापर सर्वजणांनी केलाय, परंतु आमच्या पदरात काहीचं पडले नाही. मात्र आमदार सतेज पाटील यांनी आम्हाला जनता दलासह वडीलांसारखच स्वीकारून नेतृत्व स्वीकारले. याबद्दल स्वाती कोरी यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.




काही दिवसापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी गडहिंग्लज येथे माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी चांगल्या विचारांची लढाई लढण्यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी यांना केल होते. या पार्श्वभूमीवर काल सौ. स्वाती कोरी यांच्यासह गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील जनता दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांची 'अजिंक्यतारा' कार्यालयात भेट घेतली. 



यावेळी जनता दलाचे तालुकाध्यक्ष  बाळेश नाईक, सदानंद व्हनबट्टे, शरद पाडळकर, विनोद मुसळे, काशिनाथ देवगोंडा, दत्ता मगदूम, ॲड. विकास खोराटे, अकबर मुल्ला, दत्तात्रय मगदूम, महेश उर्फ  बंटी कोरी, हिंदुराव नौकुडकर, अर्जुन पाटील, श्रीरंग उर्फ पापा चौगले, सचिन शिंदे, प्रणव शिंदे, प्रियंका यादव, सागर पाटील यांनी मनोगतामध्ये स्वाती कोरी यांच्यासह जनता दलाला पदरात घ्यावे, असे भावनिक आवाहन केले. 



आमदार सतेज पाटील हे केवळ जिल्ह्याचे नेते नसून ते महाराष्ट्राचे नेते असल्याचे, यावेळी बोलताना गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी यांनी सांगितले. आतापर्यंत आमचा वापर सर्वजणांनी केला, पण आमच्या पदरात काहीच पडलं नाही. मात्र आमदार सतेज पाटील यांनी आम्हाला जनता दलासह स्वीकारले, याबद्दल स्वाती कोरी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अनेक पक्षांनी ऑफर दिली होती मात्र आमदार सतेज पाटील हे एकमेव नेते असे आहेत की त्यांनी आम्हाला आमच्या जनता दलासह स्वीकारले. याबद्दल ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षणापासून आम्ही सर्वजण आमदार सतेज पाटील यांच नेतृत्व स्वीकारल असे त्यांनी सांगितले. लोकसभा, विधानसभेसह इथून पुढ सर्वच राजकीय निवडणुकांत आम्ही आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे वडील स्वर्गीय माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचा जो आधार होता, तोच आधार आमदार सतेज पाटील यांच्याकडून  मोठ बळ मिळाल्याचे त्यांनी सांगीतले.




माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांच्या कुटुंबियांशी आपले पूर्वीपासून घरचे संबंध आहेत. एका विचाराने आम्ही पूर्वीपासून काम करत आहोत, असे यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना, तुमचे स्वतःचे अस्तित्व ठेवून आमच्यासोबत आलात तर पाठबळ देतो असे आम्ही सांगितले होत. त्यानंतर त्यांनी जनता दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांसोबत सकारात्मक चर्चा करून आज आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतलाय, हे कौतुकास्पद असल्याचे आ पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात तुमची ताकद आहे ही या ताकदीचा उपयोग आमच्यासोबत सर्वच निवडणुकांमध्ये होईल,असे त्यांनी सांगितले. आपले ऋणानुबंध कायम ठेवण गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वर्गीय माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची उणीव कधीच भासू दिली जाणार नाही, त्यामुळे तुम्हाला कधीही पोरक आणि परक वाटू दिल जाणार नाही, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली. आपल्या देशातील लोकशाही आता धोक्यात आली आहे. भाजपाने ४०० जागा पारचा नारा दिला. त्यामुळे त्यांचा देशाची घटना बदलण्यासाठी तीन चतुर्थांश बहुमताचा अट्टाहास सुरू असल्याचा घणाघात यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केला.




धर्माच्या नावाखाली माथी भडकवण्याच काम भाजपन सुरू केले. कोल्हापूरसह इचलकरंजीतही त्यांनी असा प्रयत्न केल्याचे आमदार सतेज पाटील यांनी  सांगितले. आज स्वाती कोरी या माझ्या बहिणीला येथून पुढ काहीही कमी पडू दिल जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. येथून पुढे २५ वर्षांच राजकारण मी दूरदृष्टीन करत असल्याचे त्यांनी नमूद केल. देशावर आज भाजपाच संकट आले ते थोपवण्यासाठी आपण सर्वांनी कायमस्वरूपी एकत्रितपणे राहून विचारांची लढाई लढूया, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचा, विचार समतेचा विचार, या प्रेरणेतून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना प्रचंड मताधिक्य देऊन लोकसभेत पाठवूया, असे यावेळी त्यांनी सांगितले.




आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या गटातील सर्वजण एकत्र आले, हे भविष्याला दिशा देण्याचे मोलाचे काम घडल्याचे  माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी बोलताना सांगितले. यावेळी बाळेश नाईक, काशिनाथ देवगोंडा, सदानंद व्हनबट्टे , बाळासाहेब मोरे, राम मजगी, श्रीरंग चौगुले ,विठ्ठलराव मुसळे, भीमराव पाटील, शिवाजीराव काकडे ,पी .एम. नदाफ, हिंदुराव नौकुडकर, प्रवीण शिंदे, रामगोंड पाटील, बाळासाहेब परीट, उदय कदम, दत्तात्रय मगदूम, राजेश बोरगावे, बाळासाहेब मोरे, शशिकांत चौगुले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी आभार मानले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.