Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हसूरचंपू शिवसेना शाखा कार्यालयात शिव उद्योग संघटन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे

संघटन जिल्हाप्रमुख मारुती कमते व शिवसेना गडहिंग्लज तालुकाप्रमुख संजय संकपाळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम 




हसूरचंपू : शिव उद्योग संघटन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देताना शिवसेनेचे गडहिंग्लज तालुकाप्रमुख संजय संकपाळ व संघटन जिल्हाप्रमुख मारुती कमते. उपस्थित इतर पदाधिकारी.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिव उद्योग संघटना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने उद्योग संघटन जिल्हाप्रमुख मारुती कमते व शिवसेना गडहिंग्लज तालुकाप्रमुख संजय संकपाळ यांच्यावतीने उद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना  नियुक्ती पत्रे व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हसुरचंपू येथील शिवसेना शाखा कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.




यावेळी संघटन जिल्हाप्रमुख  मारुती कमते यांनी शिव उद्योग संघटनेबद्दल संपूर्ण माहिती दिली व सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्योग संघटना सचिव पदी अमोल नार्वेकर, चंद्रशेखर खवणे  खजिनदार, सुशील  चौगुले गडहिंग्लज तालुकाप्रमुख,  विजय पवार गडहिंग्लज उप तालुकाप्रमुख व सचिव प्रसाद नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली.




सजय सपकाळ यांनी शिवसेना पक्ष वाढवण्याकरता, शिवसेना शाखा ,शिव उद्योग संघटना मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. शाखा प्रमुख राजू गोटरे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास शिवसैनिक उपस्थित होते.



 बातमीचा व्हिडिओ येथे पहा 👇



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.