Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दहावीचे विद्यार्थी झाले 'टेन्शन फ्री'

भूगोलचा शेवटचा पेपर देत सोडला सुटकेचा निश्वास


गडहिंग्लज तालुक्यातील दहा केंद्रांवर पार पडली परीक्षा


हलकर्णी : येथील केंद्रावर इयत्ता दहावीचा शेवटचा पेपर देऊन वर्गाबाहेर आल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर टेन्शन फ्री झाल्याचा आनंद दिसत होता. 



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यात इयत्ता दहावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. तालुक्यातील एकूण दहा केंद्रांवर कडकपणे परीक्षा झाली. आज भूगोलचा शेवटचा पेपर देऊन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सुटकेचा निश्वास सोडला. 



दिनांक १ मार्च रोजी दहावी परीक्षेला प्रारंभ झाला होता. प्रत्येक पेपर नंतर अधेमध्ये विद्यार्थ्यांना सुट्ट्या मिळाल्याने अभ्यासालाभरपूर वेळ मिळाला. आज (मंगळवार दिनांक २६ ) भूगोलचा शेवटचा पेपर देत तब्बल २६ दिवसानंतर विद्यार्थी टेन्शन फ्री झाले.


तालुक्यातील बटकनंगले, जागृती हायस्कूल गडहिंग्लज, गडहिंग्लज हायस्कूल, हलकर्णी, महागाव, नूल, नेसरी, मुंगुरवाडी, कौलगे, साधना हायस्कूल  गडहिंग्लज या दहा केंद्रांवर सदर परीक्षा सुरळीतपणे पार पडली. या सर्व केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठे पथक व भरारी पथकाची स्थापना करण्यात आली होती.  गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, विस्तार अधिकारी आर. आर. कोरवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा सुरळीतपणे झाली.



हलकर्णी केंद्रावर कडक बंदोबस्त


हलकर्णी : येथील परीक्षा केंद्राबाहेर व आतमध्ये होमगार्ड जवानांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.   




गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुख आर. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. हलकर्णीसह, तेरणी, नरेवाडी, कवळीकट्टी, कडलगे, बसर्गे येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी या केंद्रावर परीक्षा दिली. कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी केंद्रावर बैठे पथक लक्ष ठेवून होते. केंद्र परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी होमगार्डनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.