Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तृतीयपंथीयांना एसटी बसमध्ये तिकिटात सवलत द्या!

गडहिंग्लजला मनसेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तृतीयपंथीयांना एसटी बस तिकीट दरात सवलत देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन हे मनसेच्या उपजिल्हा अध्यक्षा श्रीमती अनिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे.


 या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील तृतीयपंथी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. त्यांच्या हाताला ठोस काम नसल्याने भीक मागणे, नाचणे या माध्यमातून ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. लोकांनी देखील त्यांचे दैवीकरण केले असून माणूस म्हणून स्वीकारायला तयार नाहीत. तृतीयपंथी देखील महिलांप्रमाणे साडी नेसून साज शृंगार करतात. आज राज्यात महिलांना एसटी बस तिकीट दरात पन्नास टक्के सवलत आहे. मग तृतीयपंथीयांना का नाही? कारण त्यादेखील अर्ध्या महिलाच आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याचा विचार करून तृतीयपंथीयांना एसटी बस तिकीट दरात सवलत द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.



निवेदनावर मनसेच्या उपजिल्हा अध्यक्षा श्रीमती अनिता पाटील यांच्यासह शीतल पाटील, रिमा चव्हाण, इंदुबाई जाधव, शैला कुंभार, राजमती विश्वकर्मा आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.