Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शहीद भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये आदरांजली



हलकर्णी (वार्ताहर): हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये शहीद दिनानिमित्त क्रांतिकारक शहीद भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना आदरांजली वाहण्यात आली.




देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांनी ब्रिटिशांच्या सत्तेला आव्हान देत क्रांतिकारी लढा दिला. ब्रिटिशांच्या जुलमी सरकारने या क्रांतीकारकांना २३ मार्च १९३१ रोजी फाशीची शिक्षा दिली. हे तीनही क्रांतीकारक याच दिवशी देशासाठी शहीद झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले. फासावर जाताना हे तिघेही क्रांतिकारक 'मेरा रंग दे बसन्ती चोला' हे देशभक्ती गीत गात हसत हसत फासावर चढले. शहीद दिवस म्हणून ओखळला जाणार हा दिवस भारतीय इतिहासातील एक काळा दिवस आहे. या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.



प्रारंभी प्रतिमापूजन मुख्याध्यापक आर. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कु. प्रियंका कोरी हिने शहीद दिनाच्या स्मरणार्थ कविता सादर केली. कु. सोनिया संगाज हिने शहीद दिनाबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त केले. शहिदांना वंदन करून विद्यार्थ्यांनी  आपली देशभक्ती, देशप्रेम, निष्ठा यांचा आदर्श बाळगावा असे आवाहन  दिपाली बंदी यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. एस. बी. पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.