![]() |
| हलकर्णी: हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाची शपथ देताना प्रियंका कोरे. |
हलकर्णी (वार्ताहर): गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये राष्ट्रीय जल दिन साजरा करण्यात आला.
पाण्याशिवाय भविष्याची कल्पनाही करता येत नाही. पाण्याचा अपव्य टाळण्याची जबाबदारी संपूर्ण जगाची आहे. 'जल है तो कल है', जगण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. बदलत्या हवामानामुळे जलसंवर्धनाची गरज वाढली आहे. त्याबाबत जनतेत जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी जागतिक जल दिन साजरा केला जातो, याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पाठवून देण्यात आले.
शांततेसाठी पाणी वापर या २०२४ च्या थीमची माहिती डी. एस. बंदी यांनी विद्यार्थ्यांना दिली. प्रियंका कोरे हिने सर्वांच्या जीवनात पाण्याचा योग्य वापर याची शपथ दिली. यावेळी आर. एल. पाटील, एस. ए. पाटील, प्रकाश तांबडे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

