विविध स्पर्धांमध्ये महिलांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग
महिलांना आरोग्य विषयी करण्यात आले मार्गदर्शन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यामंदिर बसर्गे येथे हळदीकुंकू व पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संजीवनी नांगनुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा धबाले होत्या.
सरपंच सौ. भारती रायमाने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आण्णाप्पा शिंदे, उपाध्यक्ष सौ. मेघा चौगुले, सदस्य सातगोंडा जिनानावर, आनंद नांगनुरे, विजय शिखरी, पत्रकार अमानुल्ला मालदार, सादिक नगारसे, ग्रामपंचायत सदस्य सारिका घस्ती व तेजस्वी सुतार यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी डॉ. नीलिमा धबाले यांनी योग्य आहार, नियमित व्यायाम व पुरेशी झोप या त्रीसुत्रीचा वापर करून जीवन कसे सुखदायी करावे याविषयी मार्गदर्शन केले. अश्विनी पवार यांनी भारतीय संस्कृती बद्दल विश्लेषण केले. सौ. वैशाली धबाले यांनी 'आधुनिक जगातील स्त्रीचे महत्त्व' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर सारिका घस्ती यांनी आजच्या युगात शिक्षणाचे महत्त्व याबद्दल माहिती सांगितली.
यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. वेशभूषा स्पर्धेमध्ये सौ. सीमा कोळी प्रथम, सौ. सुजाता वालकर द्वितीय, सानिका केसरकर तृतीय, तर शारदा घुलणावर, संध्या शिंदे, मेघा चौगुले यांना उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली. वर्षा चिरमुरे व प्रिया गडकरी यांनीही या स्पर्धेत भाग घेतला. लिंबू चमचा स्पर्धेमध्ये सौ. भाग्यश्री गुरव प्रथम, सुषमा येडुरकर द्वितीय, मेघा चौगुले तृतीय तर संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये सुषमा येडुरकर यांनी यश मिळविले.
सानिका केसरकर अंगणवाडी सेविका सुजाता चौगुले, राजश्री चौगुले, महादेवी घटेकरी, वनिता कुराडे, सरला गुरव, सुनिता जाधव पार्वती फडतरे, वत्सला गोणी गौराबाई कोठी, सीमा कोळी, सुजाता वालकर, शारदा धुलानावर, संध्या शिंदे, मेघा चौगुले, वर्षा चिरमुरे, प्रिया गडकरी, भाग्यश्री गुरव, सुषमा येडूरकर, शोभा चौगुले, नागवा थोरात, रीता कांबळे, ज्योती व्हनोली उपस्थित होत्या.
सुरुवातीला मुख्याध्यापक राजकुमार शिंगटे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये शाळेच्या प्रगतीचा धावता आढावा घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैशाली धबाले, दादासाहेब पाटील, सुभाष बारामती, भिमराव तराळ, असलम मुल्ला, तन्वी कारागीर यांनी परिश्रम घेतले. यावेळी इयत्ता नववीच्या विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत पात्र झाल्याबद्दल कु. श्रावणी संभाजी चौगुले हिचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सौ. संजीवनी नांगनुरे म्हणाले, शाळेने आयोजित केलेले उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा सत्कार केल्याबद्दल मी ऋण व्यक्त करते. आजपर्यंत शाळेने सैनिकांबद्दल कृतज्ञता मेळावा, रक्षाबंधन, पर्यावरणपूरक गणपती आदी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नावलौकिक मिळवल्याचे त्यांनी सांगितले. दादासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर सुभाष बारामती यांनी आभार मानले.





