Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनो, आळस झटकून स्वतःची ओळख निर्माण करा!

आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स प्रशिक्षक सुभाष पवार यांचे प्रतिपादन 


गडहिंग्लजला जागृती हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण







गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांसमोर पूर्वी असणारी आव्हाने व आजची आव्हाने यात खूप अंतर असून विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून सक्षम बनले पाहीजे. सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्वपूर्ण असल्याने खेळामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, सचोटीतून मिळणारे यश नेहमी आनंददायी असते. आळस झटकून स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून सर्वोच्च यशाला गवसणी घालता येते, असे प्रतिपादन आतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स प्रशिक्षक सुभाष पवार यांनी केले.




गडहिंग्लज येथील जागृती हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या  पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश घाळी होते. यावेळी आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक अजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.




स्वागत मुख्याध्यापक विजय‌कुमार चौगुले यांनी केले. उपमुख्याध्यापक उमेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. जिमखाना विभाग प्रमुख संपत सांवत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.




अजित पाटील म्हणाले, बालपणापासूनच नियमित खेळ खेळण्याची गोडी लागल्यास शरीरयष्टी तंदुरुस्त राहते. आयुष्याकडे पाहण्याचा निरोगी व सकारात्मक दृष्टीकोन तयार होऊन खेळामुळे जय-पराजय पचविण्याची ताकद व कणखरता निर्माण होते. डॉ. सतीश घाळी यांनी अध्यक्षीय मनोगतातून शालेय जीवनात क्रीडा स्पर्धेचे महत्त्व व संधी या विषयावर मार्गदर्शन केले.




वार्षिक क्रीडा महोत्सवातील कबड्‌डी, खो-खो, मैदानी, बुद्धिबळ, कॅरम,  कुस्ती, रिले स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. क्रीडा स्पर्धेत समर्थ नवलाज, अनुष्का चव्हाण, साईराज दळवी, वैष्णवी कुंभार यांनी वैयक्तिक चॅम्पियनशिपचा बहुमान मिळविला. जनरल चॅम्पियनशिप चषक इयत्ता सातवी'अ' व दहावी 'क' यांनी पटकाविला.




कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.जी.आर.पाटील व सौ.ए. बी.पाटील यांनी तर आभार पर्यवेक्षक शिवाजी अनावरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपत सावंत, बाळासाहेब खरात, प्रकाश हारकारे, अनिल मसाळे, अमित हिरेमठ, प्रविण सावंत, सौ. बी. पी. सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.