Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

औषधी रोपांची लागवड करत 'न्यू वूमेन्स फार्मसी'मध्ये महिला दिन साजरा

विद्यार्थिनींनी झाडे दत्तक घेऊन संगोपनाचीही घेतली जबाबदारी 






कोल्हापूर : येथील न्यू वूमेन्स फार्मसिमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम वर्ष डी. फार्मसीच्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या परिसरात औषधी रोपांची लागवड करत, ती दत्तक घेवून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




लागवड केलेल्या झाडांमध्ये कोरफड, तुळस, जास्वंद, कडुनिंब, सदाफुली व इतर अनेक औषधी गुण असलेल्या रोपांचा समावेश आहे. सदरचा उपक्रम कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी प्रा. वैष्णवी निवेकर यांनी औषधी वनस्पती, त्यांचे उपयोग व संवर्धनासाठी गरज यांविषयी मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पियुषा नेजदार, प्रा. दिव्या शिर्के यांनी विशेष परिश्रम घेतले.




या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.