गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. पूजा गुरव यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. स्नेहल पाटील उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिला सक्षमीकरण ही आज काळाची गरज आहे. त्याचबरोबर महिलांनी व विद्यार्थिनीनी आपले आत्मसंरक्षण कसे करावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी जुन्या व आधुनिक युगातील महिलांमध्ये कसे बदल होत गेले व त्याचा परिणाम आधुनिक युगात कसा झाला याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राध्यापक मनीषा जाधव यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा देऊन शिवराज हे एक कुटुंब असून येथे महिलांचा सदैव सन्मान केला जातो असे सांगितले. यावेळी फार्मसी विभागाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, इतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रा. वैष्णवी हिरेमठ यांनी मानले.

