Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुका काँग्रेसच्या महिला सरचिटणीसपदी शेंद्रीच्या सौ. मनीषा नाईक यांची निवड

जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान




गडहिंग्लज : सौ. मनीषा मारुती नाईक यांना नियुक्तीपत्र देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील. यावेळी उपस्थित इतर पदाधिकारी.



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या गडहिंग्लज तालुका महिला सरचिटणीसपदी शेंद्री गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. मनीषा मारुती नाईक यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र कोल्हापूर जिल्ह्याचे नेते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.



निवडीनंतर बोलताना सौ. नाईक म्हणाल्या, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी महिला सरचिटणीस पदाची दिलेली जबाबदारी पक्ष हित डोळ्यासमोर ठेवून यशस्वीपणे सांभाळण्याचा प्रयत्न करेन. काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न या पदाच्या माध्यमातून केले जाईल. तसेच महिलांचे पक्ष संघटना जास्तीत जास्त मजबूत बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.   



यावेळी गोकुळच्या संचालिका श्रीमती  अंजनाताई रेडेकर, विद्याधर गुरबे,  तालुकाध्यक्ष प्रशांत देसाई, सोमगोंडा आरबोळे, दयानंद पट्टणकुडी, माजी उपसभापती इंदुताई नाईक, विक्रम चव्हाण, बसवराज आजरी, दिग्विजय कुराडे यांच्यासह  मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.