महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न
महिला आघाडी कार्यकारिणीचीही करण्यात आली निवड
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती शाखा गडहिंग्लज व शिक्षक समिती महिला आघाडी यांच्या वतीने भव्य महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संगीता मनगुळे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. मनगुळे यांनी 'स्त्रिरोग व उपचार' या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षिका गवेकर, सुरंगे ,तेली, कापसे यांनी मनोगत व्यक्त केले. हळदीकुंकू कार्यक्रमात सर्व महिलानां हळदीकुंकू देऊन वाण देण्यात आले. ओटी भरण्यात आली.
संगीत खुर्ची, मनोरंजक खेळ घेण्यात आले. या उपक्रमामध्ये सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षक समिती महिला आघाडी कार्यकारिणीची निवड देखील करण्यात आली. या कार्यकारणीच्या अध्यक्षपदी सौ रूपाली पाटील, सरचिटणीस सौ.अश्विनी दळवी,कार्याध्यक्ष-सौ.प्रज्ञा पाटील, कोषाध्यक्ष सौ.गंगा खापरे, उपाध्यक्ष-सौ.वैशाली कोरवी, उपाध्यक्ष-सौ.सुनिता लोहार, प्रसिद्धी प्रमुख -सौ.जयश्री भुसूरी, सौ.जयश्री ढापळे यांचा समावेश आहे.
या कार्यक्रम नेते सतिश तेली, अध्यक्ष व जिल्हा नेते रवळू पाटील, मार्गदर्शक संजय चाळक, चेअरमन भरत पाटील, सर्व पदाधिकारी, टी. एम. जाधव, श्रीधर पाटील, सुनिल सुरंगे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थिती होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. शांता कापसे, सौ.दिपाली पाटील, सौ. जयश्री भुसूरी, सौ. जयश्री ढापळे यांनी परिश्रम घेतले.





