Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूरच्या न्यू वूमन्स फार्मसीमध्ये 'अँटी रॅगिंग' कायद्याबाबत मार्गदर्शन



कोल्हापूर : महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा शारीरिक किंवा मानसिक छळ होऊ नये म्हणून 'अँटी रॅगिंग' शी संबंधित कोणते कायदे आहेत, त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होऊ शकतो, याची माहिती होण्यासाठी न्यू वूमन्स फार्मसीमध्ये 'अँटी रॅगिंग प्रतिबंध आणि नियमन' या विषयावर व्याख्यान झाले.



यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे जिल्हा सत्र न्यायालयातील ज्येष्ठ वकील ॲड. रमेश कुलकर्णी यांनी 'अँटी रॅगिंग' शी संबंधित "युजीसी" ची मार्गदर्शक तत्त्वे कोणती आहेत. रॅगिंगविरोधी कायदे व नियम, न्यायालयातील निर्णयांची माहिती दिली. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सीनिअर आणि ज्युनिअर विद्यार्थी यांमधील वाढणारे अंतर कमी कसे करता येईल. तसेच रॅगिंग सारख्या घटना कशा टाळता येतील याविषयी मार्गदर्शन केले.




दुसऱ्या सत्रामध्ये ॲड. प्रज्ञा नेजदार यांनी जातिभेद विरोधी कायदा यावर मार्गदर्शन केले. कार्यकमाची सुरूवात छ. शाहु महाराजांना अभिवादनाने करण्यात आली. प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांनी अभ्यासाबरोबरच कायद्याचे ज्ञान, विविध कायदे व त्याचा दैनंदिन जीवनात वावरत असताना होणारा उपयोग याविषयी मार्गदर्शन केले.




कार्यकमाचे सुत्रसंचालन प्रा. वैष्णवी निवेकर यांनी केले. आभार प्रा. दिव्या शिर्के यांनी मानले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.