गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये तीन दिवसीय कार्यशाळा उत्साहात झाली.
या कार्यशाळेस डॉ. विष्णू कांग्राळकर ( बेळगाव), डॉ.नीला भाटिया,( कोल्हापूर ), डॉ.राकेश ढवळे,( कोल्हापूर ), गौरव गाडगीळ (कोल्हापूर), अभिजित दिवाण, विजयकुमार कोरे ( पुणे) यांनी कार्यशाळेत उपस्थित नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर्फे घेण्यात येणाऱ्या ग्रॅज्युएट फार्मसी ॲपटीटुड टेस्ट, फार्मा मार्केटिंग, संशोधन कार्यप्रणाली यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबदल कार्यशाळेस डॉ.संजय चव्हाण, प्राचार्य डॉ. अन्सर पटेल डॉ. अजिक्य चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे समन्वयक प्रा. आरती कापसे, प्रा.स्वप्निल हराळे, प्रा.सुमित जोशी यांनी काम पाहिले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. रोहिणी ताटे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

