Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी मराठी विद्यामंदिरच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी रसिक- प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध

विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करत मिळविली वाह....वाह!



विविध गाण्यांवर बहारदार नृत्य, समाजप्रबोधनपर नाटिका सादर करत विद्यार्थ्यांनी जिंकली सर्वांची मने






गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मराठी, हिंदी, कन्नड अशा विविध प्रसिद्ध गाण्यांच्या तालावरील नृत्ये, पारंपारिक लोकगीते, थोर समाजसुधारकांच्या जीवनावरील जनजागृतीपर पथनाट्य, शिवरायांच्या शौर्याची गाथा सांगणारी गीते यासह विविध कॉकटेल गाण्यांवर थिरकत गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी मराठी विद्यामंदिरच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी समोर उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. एकापेक्षा एक नृत्य सादर करत विद्यार्थी व विद्यार्थिनी ग्रामस्थांची मने जिंकली.



तेरणीच्या मराठी विद्या मंदिर शाळेचा विविध गुणदर्शन कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी शाळेच्या प्रांगणात पार पडला. प्रारंभी नव्याने बांधण्यात आलेल्या रंगमंचाचे उदघाटन गडहिंग्लज पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रुपाली कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती प्रतिमापूजनानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सरपंच करवीर उथळे, उपसरपंच सौ. सोनव्वा कतिगार, माजी सरपंच व विद्यमान सदस्य मोसिम मुल्ला, अर्जुन कांबळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू इंगवले, बसवंत फडके, मुख्याध्यापक अशोक गडदराम, माजी मुख्याध्यापक मल्लाप्पा इंगवले, पोस्टमास्तर करवीर नावलगी, प्रवीण चौगुले, सौ. गीता फडके, सौ. हिरेमठ, राजू फडके, माजी सैनिक सदाशिव तोडकर, अकाप्पा कांबळे, तेरणी मराठी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, गावातील विविध मान्यवर, विविध मंडळाचे पदाधिकारी, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




प्रास्ताविकात मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांनी शाळेकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विविध गुणदर्शन कार्यक्रमाला गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगून समाधान व्यक्त केले. यावेळी माजी सभापती सौ. रूपाली कांबळे, सरपंच करवीर उथळे यांचा सत्कार करण्यात आला.




उपस्थित पालक व मान्यवरांचे विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून स्वागत केले. स्वागत गीताला शिक्षकांनी दिलेली वाद्याची साथ व विद्यार्थिनींनी एका सुरात सादर केलेल्या गीतांनी रात्रीच्या शितल चांदण्यांच्या वातावरणात रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. गणेश वंदना सादर करत विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकापेक्षा एक दिलखेचक गाण्यांवर नृत्य सादर करत टाळ्या व शिट्ट्यांची दाद मिळविली.




कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक रमजान अंकली, भास्कर पाटील, कामाना नाईक, अरुण दड्डीकर, परशराम गायकवाड, सखरू भोसले, विजय पाटील, सौ. सुरेखा मगदूम यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी गावातील विविध तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे व ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक कामाना नाईक, रमजान अंकली यांनी केले.




दरम्यान,  या कार्यक्रमाला गडहिंग्लज तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांसह शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तेरणी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे केलेले उत्कृष्ट नियोजन पाहून त्यांनी समाधान व्यक्त करत कौतुक केले.


विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सादर केलेली विविध नृत्य पहा छायाचित्राच्या माध्यमातून 👇












































Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.