भडगाव रोडवरील भाजी मंडई येथे सुरु
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी 'पाॅवर जिम'चे उदघाटन माजी पालक मंत्री, कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर जिम हे भडगाव रोडवरील भाजी मंडई येथे दुसऱ्या मजल्यावर सुरू करण्यात आले आहे.
यावेळी गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा प्रा. सौ. स्वाती कोरी, माजी उपनगराध्यक्ष महेश ऊर्फ बंटी कोरी, पॉवर जिम चे सर्वेसर्वा इम्रान मुल्ला, अप्पा शिवणे, दिग्विजय कुराडे, प्रकाश तेलवेकर, झाकीर नदाफ, अवधूत पाटील, मल्लिकार्जुन आरबोळे, बसवराज आजरी, संग्राम पाटील, शुभम चव्हाण, ऋतुराज रणवरे, जाफर तपकिरी, आक्रम जमादार व पाॅवर जिमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.







