Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खेळाडूंनो, जिद्द सोडू नका : रामकृष्ण शेंडे

गडहिंग्लजला लष्करात निवड झालेल्या फुटबॉलपटूंचा सत्कार


गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत आयोजन 



गडहिंग्लज : लष्करात निवड झालेल्या फुटबॉलपटूंचा सत्कार करताना रामकृष्ण शेंडे. सोबत महेश हासूरे, महादेव पाटील, कुमार पाटील, उदय पुजारी आदी. (छायाचित्र : सागर पोवार)


गडहिंग्लज (प्रतिनिधी): सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. पण, प्रामाणिक कठोर मेहनत घेणारे नेहमीच यशस्वी होतात. सातत्याने मेहनत घेण्याची क्षमता खेळाडूत अधिक असते. त्यामुळे ध्येय गाठू पर्यंत खेळाडूंनो जिद्द सोडू नका असा सल्ला सेवानिवृत्त ऑनररी कँप्टन रामकृष्ण शेंडे यांनी दिला. 



गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत लष्करात निवड झालेल्या फुटबॉलपटूंच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. एम. आर. हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ फुटबॉलपटू महादेव पाटील होते.




अभिजित चव्हाण यांनी स्वागत केले. प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांनी गडहिंग्लज युनायटेडमार्फत चालविल्या जाणाऱ्या गारगोटी फुटबॉल असोसिएशन प्रशिक्षण केद्रांतील फुटबॉलपटूंची लष्करातील निवड अभिमानास्पद असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. 




श्री. शेंडे पुढे म्हणाले, युनायटेडचे नवोदिता पासून वरिष्ठ खेळाडूंच्या विकासासाठी उपक्रमातील सातत्य वाखाणण्यासारखे आहे. गारगोटी आणि भडगाव केंद्रातील मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना दिशा मिळेल. याचा खेळाडूंनी लाभ उठवयाला हवा.




जय जवान जय किसान फौंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी खेळाडूंसाठी लष्करातील संधीची माहिती भाषणातून दिली. यावेळी इद्रंसेन केसरकर, आकाश कासार यांचा लष्करात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आकाश कासारने सत्कार बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 



यावेळी महेश हासुरे, तानाजी देवेकर, सौरभ जाधव, सागर पोवार, सुल्तान शेख यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. पोलीस पाटील उदय पुजारी यांनी आभार मानले.



धोरण बदलेल...!


अग्नीवीरच्या चार वर्षांच्या सेवेच्या अटीने भरती होणाऱ्या युवकांत अस्वस्थता आहे. पण, उत्तम कामगिरीच्या जोरावर निवड केली जाते. तीच प्रामाणिक मेहनतीची सवय लष्करात कायम होण्यास मदतनीस ठरू शकेल. सुरुवातीला पंचवीस टक्के अट आता पन्नास टक्के जवानांना कायम करणार असल्याची घोषणा संरक्षण मंत्रालयाने केली आहे. अग्नीवीरचे प्रमाणपत्र देखील इतर ठिकाणी नोकरीसाठी उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात अग्नीवीरचे धोरण बदलून पुर्वीप्रमाणेच होण्याची शक्यताही श्री शेंडे यांनी  व्यक्त केली.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.