Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

विविध कार्यक्रम, उपक्रम राबवत जयंती मोठ्या उत्साहात साजरी


                                                            

हलकर्णी: कलाम फौंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सुपूर्द करताना जयकुमार मुन्नोळी, अमरदीप व्हसकोटी, इम्तिहाज मुल्ला, पत्रकार अमानुल्ला मालदार व अन्य मान्यवर. 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती तालुक्यातील हलकर्णी येथे विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची आदी कार्यक्रम पार पडले.



  

 

हसुरवाडी येथून सकाळी भीम ज्योत आणण्यात आली. त्यानंतर समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयकुमार मुन्नोळी, विजय शेरवी, पत्रकार अमानुल्ला मालदार, बाबालाल अत्तार  यांनी मार्गदर्शन केले.




याप्रसंगी कलाम फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत  महिलांनी एक सारखा पोशाख केला होता. दुचाकीवरील झेंडे लक्षवेधी ठरले. समाज मंदिरावर  जयंतीनिमित्त  आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री लेझर शो चे आयोजन करण्यात आले होते. पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.दरम्यान,  भीम कन्या लेझीम पथकाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. 




यावेळी ग्रामपंचायत सदस  विजय शेरवी, अविनाश दुध्यागोळ, शिवानंद मठपती, अमरदीप  व्हसकोटी, नीता मऱ्यापगोळ, अश्विनी पाटील, चंद्रकांत गुरुवानगोळ, गजानन सूरनाईक, काशिनाथ रवेदार, रामलिंग दुध्यागोळ, प्रेम मऱ्यापगोळ, राजू मुन्नोळी, नागेश म्हेत्री,  रोहन चिकबसर्गे,  विनोद सुरनाईक, उमेश सुरनाईक, प्रशांत खानापुरे, अश्विन माने, अरविंद ढंगणावर, संतोष सुरनाईक, इम्तिहान मुल्ला, अप्पासाहेब यमकनमर्डी, इरफान मकानदार, रियाज काझी,  माजी सैनिक इमामहुसेन पानारी, मुजमिल कादरभाई, ख्वाजा मालदार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 कार्यक्रमाचे व्हिडिओ येथे पहा 👇👇













Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.