Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या महात्मा फुले विद्यालयाच्या सहा विद्यार्थांना प.पू. सदगुरु श्री.एकनाथदादा शिक्षण शिष्यवृत्ती

हत्तरगी:  येथे मठाधिपती डॉ. आनंद गोसावी महाराज, जे. बी. बारदेस्कर यांच्या हस्ते शिष्यवृत्ती स्वीकारताना महात्मा फुले विद्यालयाचे विद्यार्थी. 



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांना श्री हरी मंदिर हत्तरगी (यमकनमर्डी) ता. हुक्केरी मठामार्फत प.पू. सद्गुरु श्री.एकनाथदादा शिक्षण शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. त्याचे वितरण मठाधिपती डॉ.आनंद गोसावी महाराज, साधना शिक्षण संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर, हुक्केरी कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश आवलगी, मुख्याध्यापिक वहिदा मुल्ला यांच्या हस्ते हरीमंदिर हत्तरगी येथे वितरण करण्यात आले.





यामध्ये संचिता जावळे, कल्याणी गंधवाले, संकेत पाटील, श्रेयस रेडेकर, सृष्टी मोकाशी, अश्विनी कापसे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. महात्मा फुले विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल मोहन कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यासाठी सुनील देसाई, रावसाहेब मुरगी यांचे सहकार्य लाभले.

     


यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक चेअरमन शंकरराव पाटील, प्राचार्य आय. एस. पाटील, संस्था प्रतिनिधी प्रा. डी.एस. पाटील, आण्णासाहेब पाटील, यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.