Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हत्तरगी गटाची ताकद प्रा. संजय मंडलिक यांच्या पाठीशी

महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना पाठिंबा जाहीर 


मंडलिक यांना मोठे मताधिक्य देणार : युवा नेते अमेय हत्तरगी 




कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील हत्तरगी गटाने काल महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला. कोल्हापूर येथील राजाराम कारखान्यावर झालेल्या बैठकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या उपस्थितीत हत्तरगी गटाच्या कार्यकर्त्यांनी मंडलिक यांच्या पाठीशी ताकत उभी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, युवा नेते अमेय सदानंद हत्तरगी यांनी प्रा. मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने विजय करू असा शब्द दिला.




यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, युवा नेते अमेय हत्तरगी, गडहिंग्लज तालुका शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष वरदशंकर वरदापगोळ, डॉ. गंगाधर व्हसकोटी, वीरशैव बँकेचे माजी अध्यक्ष महादेव साखरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मलगोंडा पाटील, चंदू पाटील, भूषण पाटील, संकेश्वर साखर कारखान्याचे संचालक उदय देसाई, ॲड. सुरेश कुराडे, सिद्धाप्पा कल्याणी, अशोक स्वामी, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सातलिंग जिन्नानावर, उत्तम येणेचवंडी, सागर पाटील, बाबुराव खामकर, दत्ता पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.