Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत गजानन पॉलीटेक्निकमधील विद्यार्थ्यांना शुभेच्छा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव  येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निक मधील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ झाला प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी शरद मगर तर अध्यक्षस्थानी विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण हे होते.



स्वागत व प्रास्ताविक प्राचार्या रोहिणी पाटील यांनी केले. यावेळी शरद मगर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपले शिक्षण पूर्ण करून ध्येय गाठावे असे आवाहन करत स्पर्धा परीक्षा आणि शासकीय नोकरीतील संधी यावरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते स्वाती कडलगे, साक्षी भोसले, प्रीती अवडन, विभावरी देवार्डे, आदित्य तेऊर वाडे, वेदांत पोटे-पाटील, मयूर दळवी, सुबिया पठाण या विद्यार्थ्यांचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आला.




यावेळी संस्थाध्यक्ष ॲड. अण्णासाहेब चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, ॲड. बाळासाहेब चव्हाण, डॉ. अजिंक्य चव्हाण, प्रा. मंजुनाथ पाटील, प्रा. संतोष पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रा. मंजुनाथ पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.