बी. बी. ए., बी. सी. ए. सीईटी रजिस्ट्रेशनसाठी ३० एप्रिल पर्यंत मुदत वाढ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या बी.बी.ए., बी.सी.ए.च्या प्रवेश परीक्षेच्या माहिती केंद्रामार्फत बी.बी.ए., बी.सी.ए.अभ्यासक्रमाला प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयात मोफत रजिस्ट्रेशन करण्यात येत आहे.
या सीईटीसाठी फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर शासनाने दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत मुदत वाढ दिली आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा शिवाय या सीईटी प्रवेश परीक्षेचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयात २४ एप्रिल २०२४ पासून मोफत कोचिंग क्लासेस सुरु करण्यात येत आहेत. तरी विद्यार्थ्यांनी बी.बी.ए.व बी.सी.ए.च्या सीईटीचे कोचिंग क्लासेसचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम व अॅकेडमिक डायरेक्टर डॉ.आर.एस.निळपणकर यांनी केले आहे. तसेच बारावी पास व सद्या बारावी परीक्षा दिलेल्या कोणत्याही शाखेच्या इच्छुक विद्यार्थ्यांनी शिवराज महाविद्यालयात प्रवेश परीक्षा माहिती केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधून रजिस्ट्रेशन करून या मुदतवाढीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. तसेच या प्रवेश परीक्षा संदर्भात अधिक माहितीसाठी प्रा.के.एस.देसाई ९९७०२२२७६७, बी.बी.ए.विभाग प्रमुख प्रा.आर.डी.कमते-९५५२६३५३८६, प्रा.विक्रम शिंदे ९१५८९१४६४५, मिल्टन नोरेंज ९९२३४१६६१४ यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.

