हलकर्णी (वार्ताहर): येथील पार्श्वनाथ भगवान दिगंबर जैन समाजाच्या वतीने जैन धर्माचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.
प्रारंभी सकाळी मंदिरात पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. मुंगुरवाडी, दुगूणवाडी येथील लेझीम पथकांनी विविध प्रात्यक्षिके सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पालखी व प्रतीमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
महिला व मुलांनी एकाच प्रकारचा पोशाख परिधान केला होता. सायंकाळी जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जैन कमिटी, वीर सेवा दल, पद्मावती महिला मंडळ, सरपंच योगिता संगाज, ग्रामपंचायत सदस्य विजय शेरवी, किरण संगाज, माजी सरपंच भीमाप्पा शिखरी, राजू वड्राळे, दिनेश गळतगे अक्षय सन्माने, चंद्रकांत धुपदाळे, जम्बो शेरवी, डॉ प्रसन्न चौगुले, विनायक बागी, राजू मुन्नोळी, भुपाल शिखरी, प्रीती समई, अनुष्का संगाज, सानवी चौगुले, प्रेमा मुन्नोळी यांच्यासह जैनबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






