Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयाच्या बी.कॉम (आय.टी.)भाग तीनच्या पहिल्या बॅचचा शंभर टक्के निकाल



राजनंदिनी बिलावर, सपना सावंत, रोहन लोहार, श्रुष्टी पाडळकर, हर्ष सावंत यांनी मिळविले यश 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाच्या बी.कॉम. (इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी) भाग तीन या वर्गाचा पहिल्या बॅचचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या बॅचमध्ये प्रथम - राजनंदिनी बिलावर -९० टक्के, व्दितीय – सपना सावंत ८० टक्के , तृतीय - रोहन लोहार - ७१ टक्के , चतुर्थ श्रुष्टी पाडळकर आणि हर्ष सावंत -७० टक्के गुण मिळवून गुणानुक्रमे आले. कंपनी सेक्रेटरी परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल राजनंदिनी बिलावर तसेच गुणानुक्रमे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.




या सर्व यशस्वीतांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन तर विभाग प्रमुख डॉ.महेश चौगुले प्रा.एम.जे.पाटील, प्रा.पी.व्ही.शिंदे, प्रा.एन.जी.गावडे, प्रा.विक्रम शिंदे व अन्य शिक्षकांचे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.