मंजूर कर्जाचे वितरण लवकरात लवकर करण्याची विनंती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिव उद्योग संघटने मार्फत राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापकांना मंजूर कर्जाचे वितरण लवकरात लवकर करण्यात यावे असे विनंती पत्र संघटनेचे जिल्हाप्रमुख मारुती कमते यांच्या हस्ते देण्यात आले.
शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटना महाराष्ट्रातील तरुणांना महिलांना, रोजगार पुरवण्यासाठी कार्य करीत आहे. शिव उद्योगचा महाराष्ट्रातील स्थानिकांना रोजगार व व्यवसाय संधी मिळवून देणे हा उद्देश आहे.
व्यवसायावृद्धी आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जातात त्या योजना मार्फत मुद्रा लोन, PMEGP , CMEGP , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ या आणि अशा सर्व सरकारी योजनांमध्ये ज्या व्यक्तींचे अथवा आस्थापनांचे कर्ज मंजूर झाले आहे त्यांचे वितरण लवकरात लवकर व्हावे अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. सदर पत्र संघटनेचे जिल्हाप्रमुख मारुती यांच्या हस्ते सर्व राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापकांना देण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा खजिनदार चंद्रशेखर खवणे, गडहिंग्लज तालुका शिव उद्योग संघटना प्रमुख सुशीलकुमार चौगुले उपस्थित होते.



