Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखल्या पाहिजेत!

असिस्टंट पी.एफ. कमिशनर अमित चौगुले यांचे प्रतिपादन


शिवराज महाविद्यालयात बी.एस्सी. कॉम्प्यूटर सायन्स तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ



                                              छायाचित्र : मज्जिद किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): आपण जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण घेणे काळाची गरज आहे. पदवी शिक्षण झाले म्हणजे झाले असे नाही. शिकण्याची प्रक्रिया ही कधीच संपत नसते. ती पुढे चालू ठेवावी लागते. ती प्रक्रिया वेळीच समजून घेतली तर आपण आयुष्यात यशस्वी होतो. विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखून आपली वाटचाल यशस्वी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापुर विभाग पी.एफ.विभागाचे असिस्टंट कमिशनर अमित चौगुले यांनी केले. 



गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात बी.एस्सी. कॉम्प्यूटर सायन्स तृतीय वर्षाच्या शुभेच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते तर संस्थेचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, संचालिका  प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.




स्वागत व प्रास्ताविक कॉम्प्यूटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. आर. के. पाटील यांनी केले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. चौगुले पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी करिअरचा कोणता मार्ग निवडला यापेक्षा आपण योग्य असा मार्ग निवडलेला आहे का ? याचा विचार करून कौशल्यपूर्ण शिक्षणाने विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल यशस्वी करावी. असे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा करिअरसाठी उत्तम मार्ग आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्यूनगंड काढून टाकणे गरजेचे आहे, तसेच अपयश पचवून यशस्वी होणे गरजेचे आहे. आज आपल्या समोर खूप आव्हाने आहेत. त्या आव्हानांना सामोरे जाणे महत्वाचे आहे. शिवाय आपण निवडलेल्या क्षेत्राला न्याय देण्याच्या प्रक्रियेतून सर्वोत्तम कामगिरी करून आपले जीवन समृद्ध करावे असे आवाहन श्री. चौगुले यांनी केले. 




यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गडहिंग्लजचे मॅनेजर शशिकांत धुमाळ यांनी ग्रामीण विद्यार्थी हा कष्ट करण्यात कधीच कमी पडत नाही. फक्त त्याला दिशा देण्याची गरज आहे. आपल्या जडणघडणीत कॉलेजची तीन-चार वर्ष ही अत्यंत महत्वाची वर्ष आहेत. आपल्या जीवनाची घडी बसविण्यासाठी तसेच आयुष्यात सुख आणि समाधान मिळविण्यासाठी  कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन समृद्ध जीवन घडविणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.





यावेळी संस्था सचिव डॉ. अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, ॲकेडेमिक डायरेक्टर डॉ. आर. एस. निळपणकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात कँपस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या डिपार्टमेंटचे विद्यार्थी ऋतुजा देसाई, प्रथमेश पोटेकर, सानिका घमे या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ऋतुजा देसाई, प्रथमेश पोटेकर, सानिका घमे, वैष्णवी पुंडपळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बी.बी.ए विभाग प्रमुख प्रमुख प्रा.आर.डी.कमते, प्रा. आय.पी.सुतार, प्रा.शिल्पा केसरकर, प्रा.वैशाली कळसगोंडा, प्रा.सोनाली पाटील, प्रा.सचिन कांबळे, प्रा.उमेश कानडे, प्रा.बाबासाहेब देसाई, प्रा.संजय कुपेकर, प्रा.विक्रम शिंदे, श्री सचिन काटे, डिपार्टमेंटचे सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन ऐश्वर्या मठपती, श्रेया पाटील यांनी केले तर आभार प्रा.सारिका शिंदे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.