गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज विद्या संकुलातील विद्यार्थ्यांना बजाज-फिन्सर्व तर्फे आयोजित ‘सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स’ या एक महिन्याच्या कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रारंभी समन्वयक डॉ. महेश चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कोर्सचे सर्टिफिकेट वितरण गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे प्रमुख आय.पी.एस. प्रशिक्षणार्थी अधिकारी हर्षवर्धन बी.जे., प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. येथील शिवराज विद्या संकुलात कॉमर्स विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा कार्यक्रम संपन्न झाला.
शिवराज विद्या संकुल व बजाज-फिन्सर्व यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक महिन्याचे सर्टिफिकेट अभ्यासक्रम शिकविण्यात आले. यावेळी बजाज-फिन्सर्वच्या सी.एस.आर.फंडातून एक लॅपटॉप व एल.सी.डी. प्रोजेक्टर बजाज फिन्सर्वचे प्रतिनिधी श्री अमित याळगी यांच्या हस्ते महाविद्यालयास प्रदान करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, कॉमर्स विभागाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.


