Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी, तेरणीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा

हिंदू बांधवांनी जिलेबी वाटप, गुलाब पुष्प, गळाभेट घेत हिंदू-मुस्लिम ऐक्य जपले  



विश्वशांतीसाठी मुस्लिम बांधवांनी नमाजद्वारे केली सामुदायिक प्रार्थना 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी व तेरणी येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विश्वशांतीसाठी नमाज पठणाद्वारे मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली. यानिमित्त विविध कार्यक्रम  व उपक्रम पार पडले.  




रमजान हा मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. एक महिना नमाज, जकात, उपवास, तरावीह असे विविध कार्यक्रम पार पडले. हलकर्णीत सकाळी येथील इदगाह मैदानावर ईद-उल-फित्र सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. हाफिज मोहम्मदमोहसीन रजा आणि हाफिज मोहम्मद मकानदार यांनी  हिंदू- मुस्लिम ऐक्य, समृद्धी, शांतता नांदू दे, देशावर कोणतेही संकट न येवो अशी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. नमाज नंतर गळाभेट करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. घरोघरी गोड शिरखुरमाचा बेत केला होता. 




यावेळी हाफिज मोहम्मद  मकानदार, मुस्लिम सुन्नत जमात अध्यक्ष अलीसाहेब कादरभाई, उपसरपंच सलीम यमकनमर्डी, शकील पट्टणकुडी, नूर मकानदार, नजीर बागवान, हाजी लायकअली मालदार, इस्माईल यमकनमर्डी, अयाज बागवान, आप्पासाहेब यमकनमर्डी, अबूबकर बाणदार, अल्ताफ मुल्ला, एच.एम.पानारी, मौला हावळे, राजू खलिफा, मलिक कादरभाई, सादिक नगरसे, इकबाल बाणदार, माजी सरपंच असगरअली बागवान, हमीद पानारी यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.   




डॉ. व्हसकोटी यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा!


रमजान ईद निमित्त येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्यासह अनेक मान्यवरांनी गळाभेट घेत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.



इंडिया आघाडीच्या वतीने मुस्लिम बांधवांना जिलेबी वाटप 




हलकर्णी येथे रमजान ईद निमित्त इंडिया आघाडीच्या पूर्व भागातील कार्यकर्त्यांमार्फत हलकर्णी परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना जिलेबी वाटप करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे बंध आणखी घट्ट करण्यात आले. यावेळी नरेवाडीचे सरपंच अंकुश रणदिवे, राष्ट्रीय काँग्रेसचे  कार्यकर्ते नागराज जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार पक्ष) शंकर केसरोळी, चंदनकुडचे कार्यकर्ते सत्याप्पा पाटील, जुबेर कादरभाई उपस्थित होते.




तेरणी येथील मुस्लिम बांधवांना संत गजानन शिक्षण समूहाकडून शुभेच्छा! 




रमजान ईद निमित्त तेरणी येथील मुस्लिम बांधवांना महागाव येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहाच्या वतीने विश्वस्त डॉ. संजय चव्हाण, चंदगड विधानसभा युवा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य चव्हाण यांनी  सदिच्छा भेट देत, गुलाब फूल देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी तेरणी गावातील मुस्लिम सुन्नत जमात  व अहले मुस्लिम सुन्नत जमातचे सर्व पदाधिकारी व मुस्लिम बांधव उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.