थायलंड येथे पार पडली स्पर्धा
डॉ. जयश्री पाटील, डॉ. आर. डी. पाटील यांनी केले अभिनंदन

आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त गोपालकृष्ण कालेकर यांचे अभिनंदन करताना नेसरी येथील श्रद्धा हॉस्पिटल योग व गर्भसंस्कार केंद्राचे संचालक डॉ. जयश्री पाटील, डॉ. आर. डी. पाटील.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): वर्ल्ड योगा स्पोर्ट्स फेडरेशन, ॲम्याच्युअर योगा थायलंड व योगा कल्चर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बँकॉक (थायलंड) येथे पार पडलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत गोपालकृष्ण कालेकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना पारंपारिक योग स्पर्धा प्रकारात 40 ते 50 वयोगटात रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेत थायलंड, लाओस, भारत, कंबोडिया, इंडोनेशिया आदी देशांचे खेळाडू सहभागी झाले होते.
पारंपरिक योगा प्रकारात गोपाल कृष्ण कालेकर यांनी हस्तपादासन, फॉर अँगल, लिझार्ड, लिझर्ड व्हेरिएशन व टविस्टिंग गॉडेस ही आसने सादर केली. श्री. कालेकर यांच्या या यशाबद्दल नेसरी येथील श्रद्धा हॉस्पिटल योग व गर्भसंस्कार केंद्राचे संचालक डॉ. जयश्री पाटील, डॉ. आर. डी. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.


