गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवसेना शाखा कार्यालय हसुरचंपू येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी पोलीस पाटील परशराम पाटील, लक्ष्मण तोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाप्रमुख मारुती कमते यांच्या हस्ते प्रचाराचा श्रीफळ वाढवण्यात आला. लक्ष्मण तोडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
मारुती कमते यांनी प्रचाराचे नेटके नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रशेखर खवने, सुभाष हेबुल्ले, चंद्रकांत हसुरे, विजय पोवार, रमेश चौगुले, अण्णासाहेब कोरी, अणाप्पा नांगनुरे, महादेव मस्ती, बिराप्पा हिकेरी, लक्ष्मण नांगनुरे, गंगाराम हुक्केरी, अजित कमते, शिवाजी कुंभार, बुरप्पा कुरणे, इरापण्णा फुटाणे, बसू फुटाणे व सर्व शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते. शाखा प्रमुख राजू गोटुरे यांनी आभार मानले.




