Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा!

हलकर्णी, कडलगे येथे विद्यार्थ्यांनी केली रॅलीद्वारे मतदार जनजागृती 


आरोग्य विभाग, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सहभाग






हलकर्णी (वार्ताहर) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य सेविका, आशा वर्कर्स, हलकर्णी भाग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विद्या मंदिर गांधीनगर, केंद्र शाळा, उर्दू विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो! अशा घोषणा देत मतदारांना मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. दरम्यान, कडलगे येथे देखील विद्या मंदिर कडलगेच्या  विद्यार्थ्यांनी रॅली काढत मतदानाबाबत जनजागृती केली.




सदर रॅली गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो मतदानाचा धागा हो, मतदान आपला अधिकार आणि जबाबदारी, वृद्ध असो वा जवान सर्वजण करा मतदान, आपले अमूल्य मत करेल लोकशाही मजबूत आदी घोषणा देण्यात आल्या. या घोषणांमुळे विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.




यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्य लिहिलेले फलक हातात धरले होते. प्राचार्य आर. एस.पाटील, मुख्याध्यापक विजय कोळी, मुख्याध्यापिका वैशाली जोशीलकर, मुख्याध्यापिका परवीन दीडबाग , आरोग्य सेविका अर्चना शिंदे आशा वर्कर्स यांच्यासह हलकर्णी भाग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.











 जनजागृती रॅलीचे व्हिडिओ येथे पहा 👇




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.