गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील हलकर्णी भाग ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहीत मतदानाबाबत जनजागृती केली.
भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दर पाच वर्षानी निवडणुका होतात. या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ करणाऱ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे नुतन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यांच्या सूचनेप्रमाणे हलकर्णी भाग ज्यूनियर कॉलेजमधील 100 टक्के विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला.
स्वतःच्या भविष्यासाठी व लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मुलाने पत्राद्वारे आपल्या पालकांना हट्ट धरला आहे. या उपक्रमासाठी प्राचार्य आर. एस. पाटील सहकार्य लाभले . तसेच प्रा. एस. एम. वडर, प्रा. एस. जी. खानापूरे, प्रा. एम. एम. पानारी, प्रा.सौ. जे. एस. जाधव, प्रा. सौ. पी. व्ही. मुंगुरवाडी, प्रा. एस. व्ही. भोगाणे यांनी नियोजन केले.
व्हिडिओ येथे पहा 👇👇



