Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे होते.




प्रारंभी प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी स्वागत करून प्रास्ताविकात शुभेच्छा समारंभ आयोजनाचा हेतू सांगून दोन वर्षामध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थी हिताचे कोण-कोणते उपक्रम राबविण्यात आले याचा आढावा घेतला. शिवाय विद्यार्थ्यांना करिअरच्या संधीबाबत माहिती दिली.




यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी मार्गदर्शन करताना शिवराज विद्या संकुलाने आपल्या कार्यात नेहमीच समाजशीलता जपली आहे. या संस्थेने या उपविभागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करण्याचे व्रत जपले आहे. त्याचबरोबर समाजातील विविधांगी कार्याला बळ देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय फार्मसी हा विभाग आरोग्याशी निगडीत आहे. त्यामुळे या शिक्षणातून सेवाभावी वृत्ती जोपासणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. आपल्याला मिळणारे ज्ञान हे समाजाच्या सेवेसाठी मोलाचे असल्याचेही त्यांनी सागितले.




यावेळी 'बेस्ट स्टुडंट' म्हणून साक्षी गडदार या विद्यार्थीनीचा सत्कार सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. फार्मसीचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मनीषा जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.