गरीब व गरजू महिलांना शीरखुर्मा बनवण्यासाठी शिधावाटप
ईदगाह मैदान सुशोभीकरणासाठी २० लाखाचा निधी दिल्याबद्दल आमदार राजेश पाटील यांचा सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): रमजान ईद निमित्त आमदार राजेश पाटील यांनी हलकर्णी येथील गरीब व गरजू महिलांना शिधा वाटप केले. इफ्तार पार्टीचे आयोजन करून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या निमित्ताने अल्पसंख्याक निधीतून ईदगाह मैदानात पेव्हिंग ब्लॉक व सुशोभीकरण कामासाठी 20 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल व सदर काम रमजानपूर्वी पूर्ण केल्याबद्दल आमदार राजेश पाटील यांचा सत्कार मुस्लिम सुन्नत जमातचे अध्यक्ष अलीसाहेब कादरभाई यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी यांचा सत्कार उपाध्यक्ष नजीर बागवान यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अभयकुमार देसाई ,नूर मकानदार, माजी सरपंच भीमाप्पा शिखरी, रामलिंग दुध्यागोळ, हाजी लायकअली मालदार, युवा उद्योजक शिवकुमार संसुद्धी, ग्रामपंचायत सदस्य अविनाश दूध्यागोळ, गंगाराम पाटील, बाळू पाटील, अमरदीप व्हसकोटी, उमरअली बागवान, अप्पासाहेब यमकनमर्डी, मौला हावळे, अबूबकर बाणदार, असगरअली बागवान, सलीम कुंदरगी, फारुख हट्टी, गैबु कोणकेरी ,चंद्रकांत गुरुवानगोळ शब्बीर बागवान, मोबीन बामणे, बाबालाल अत्तार, हमीद पानारी यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक पत्रकार अमानुल्ला मालदार यांनी केले. आभार अल्ताफ मुल्ला यांनी मानले.








