जॅकवेलकडुन येणारी मेन पाईप लाईन आजरा रोडवर फुटल्याने दुरुस्तीचे काम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शहरात राष्ट्रीय महामार्गचे काम चालू असताना जॅकवेल कडुन येणारी मेन पाईप लाईन आजरा रोड या ठिकाणी फुटली आहे. सदर ठिकाणी दुरुस्ती कामे करावयाची असल्याने उद्या शुक्रवार दिनांक 26 एप्रिल रोजी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

