Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मांगनुर तर्फ सावंतवाडी शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): मांगनूर तर्फ सावंतवाडी (ता. गडहिंग्लज) येथील शिवराज विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात झाला. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी सन 1983 ते 89 दरम्यानच्या तुकडी मधील विद्यार्थ्यांनी 35 वर्षानंतर एकत्र येत विविध उपक्रम राबवून स्नेहमेळावा उत्साहात साजरा केला.




स्वागत भरमा मोरे यांनी केले. यानिमित्त माजी शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान अविनाश कोकितकर, रमेश नाईक, आनंदा गुरव, शीला गोडसे, परशराम सावंत या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानिमित्त वर्गमित्र मैत्रिणीने शाळेतील प्रत्येक वर्गासाठी फॅन संच भेट दिला विद्यार्थ्यांना खाऊवाटप व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.





यावेळी  मुख्याध्यापक सदानंद मोरे, अर्जुन सावंत, शामराव शिंगटे, आण्णाप्पा गोटुरे, रामचंद्र शिंगटे, आत्माराम देसाई सह आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. हनमंत सुतार यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.