अर्धा तास वाहतूक झाली होती ठप्प
तातडीने रस्त्यावरून झाड हटवल्याने वाहतूक पूर्ववत
बेरडवाडीकडे गेलेली नळपाणी पुरवठा पाईपलाईन देखील फुटली
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील चनेकुप्पी फाट्याजवळ भडगाव येथील हिरेमठ यांच्या शेताजवळ सायंकाळी पाचच्या दरम्यान मोठे बाभळीचे झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने अर्धा तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तातडीने झाड हटवण्याचे काम हाती घेतल्याने आता वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
दरम्यान, हे झाड मुळासकट उन्मळून पडल्याने या झाडाखालून बेरडवाडी गावासाठी गेलेली नळ पाणीपुरवठा पाईपलाईन देखील फुटली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.






