Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भल्या मोठ्या गटारी शोभेला, पाण्याचा निचरा काय होईना!

गडहिंग्लज शहरातील चित्र; नागरिकांतून नाराजी 


संकेश्वर रोडवर एसटी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरले 


माजी नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांनी लक्ष वेधताच मुख्याधिकारी यांनी केली पाहणी 


तातडीने उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना  




गडहिंग्लज : 1) जोरदार पावसामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी एका दुकानात शिरले. 2) महामार्गाच्या भल्या मोठ्या गटारी झाल्या, मात्र असे पाणी तुंबून राहत आहे. ( छायाचित्र : मज्जिद किल्लेदार )



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शहरात संकेश्वर-बांदा महामार्गाच्या दोन्ही बाजूला भल्या मोठ्या गटारी बांधण्यात आल्या असल्या तरी विविध कॉलन्यांमधून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याचे चित्र समोर येत आहे. जोरदार पावसामुळे साई प्लाझा जवळ एसटी कॉलनीकडून येणारे पाणी तुंबून हे पाणी विविध दुकानांमध्ये घुसले आहे. यामुळे या व्यवसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. महामार्गाच्या या गटारींचे चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाल्याचे बोलले जात असून त्याच्या दर्जावरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महामार्गाचे काम चर्चेत आले आहे.



 

शहरातील हॉटेल साई प्लाझा जवळील एसटी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याकडील कोपऱ्यावर जोरदार पावसामुळे पाण्याचा निचरा योग्यरीत्या न झाल्याने येथील इंडिया गॅरेज व आजूबाजूच्या परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी तुंबले आहे. हे पाणी आजूबाजूच्या दुकानांमध्ये घुसले. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.तसेच येथे नव्याने बांधलेल्या गटारीवर मोठे भगदाड पडल्याने गटार बांधकामाच्या दर्जा बाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.


गडहिंग्लज : महामार्गाच्या दोन्ही बाजूला नव्याने बांधण्यात आलेल्या गटारीवर असे भले मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ( छायाचित्र : मज्जीद किल्लेदार )


दरम्यान, या समस्येकडे माजी नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांनी पालिका मुख्याधिकारी संजय गायकवाड यांचे याकडे लक्ष वेधले. मुख्याधिकारी श्री गायकवाड यांनी तातडीने या ठिकाणी येत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करत माहिती घेतली. तातडीने ही समस्या सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी राजेश बोरगावे, प्रदीप देसाई, झुंजार देसाई, रवी सोलापुरे, प्रकाश पाटील, चंदू हेबुले आदींसह दुकानदार व नागरिक  उपस्थित होते.



 व्हिडिओ येथे पहा 👇





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.