कोल्हापूर ८.०४ तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदान
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे रोजी सकाळी ७.०० वाजल्या पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:
लातूर - ७.९१ टक्के
सांगली - ५.८१ टक्के
बारामती - ५.७७ टक्के
हातकणंगले - ७.५५ टक्के
कोल्हापूर -८.०४ टक्के
माढा -४.९९ टक्के
उस्मानाबाद -५.७९ टक्के
रायगड -६.८४ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७ टक्के
सातारा -७.०० टक्के
सोलापूर -५.९२ टक्के

