गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील साधना हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव जे. बी. बारदेसकर होते.
कु. तृप्ती शंकर राजमाने हिने ९७.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर कु. शालोम अरविंद बारदेस्कर याने ९६.४० टक्के तर कु. शायानखान युनुसखान पठाण याने ९४.८० टक्के, कु. श्रावणी शशीकांत जगदाळे ९३.६० टक्के, कु. वेद प्रविण बेल्लद ९२.८० टक्के व कु. साक्षी दत्तात्रय मिसाळ ९२.८० टक्के गुण मिळवून अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकावले.
१२१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य व ६८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवून उत्तुंग यश मिळवले. एकुण २२ विद्यार्थ्यांनी ९० टक्केहून अधिक गुण मिळवत शाळेचे नाव लौकीक केले. सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशालेमार्फत करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य आर. एन. पटेल तर आभार शितल हरळीकर यांनी मानले. सदर विद्यार्थ्यांना प्रशालेचे पर्यवेक्षक अरविंद बारदेरकर, संस्था अध्यक्ष चंद्रकांत गुजर, संस्था संचालिका सौ. फिलॉन बारदेसकर, प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

