Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रकल्पांची नावे व गडहिंग्लजपासूनचे अंतर याची माहिती नकाशासह सादर करा!

कोल्हापूर पाटबंधारेच्या दक्षिण विभागाला पाटबंधारे मंडळाच्या उपअधीक्षक अभियंता यांचे आदेश 


इंचनाळ येथील अमृत गुंडू शिंत्रे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे वेधले होते लक्ष ; पाठपुराव्याला यश 


मंत्री मुश्रीफ यांनी तातडीने लक्ष घालत कार्यवाही करण्याच्या दिल्या होत्या सूचना  





गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर पाटबंधारेच्या दक्षिण विभागांतर्गत गडहिंग्लज विभागात सुरू असलेल्या प्रकल्पांची नावे व त्या प्रकल्पांचे गडहिंग्लजपासूनचे अंतर याबाबतची सविस्तर माहिती नकाशासह सादर करण्यात यावे असे आदेश कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे उपअधीक्षक अभियंता संजय पाटील यांनी पाटबंधारेच्या दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना पत्राद्वारे दिले आहेत. पाटबंधारे च्या दक्षिण विभागाचे कोल्हापूर येथील कार्यालय गडहिंग्लज येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी गडहिंग्लज विभाग शेतकरी सर्व मोटर पंपधारक अन्याय निवारण समितीचे सदस्य अमृत गुंडू शिंत्रे (इंचनाळ) यांनी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करत या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. दरम्यान, या संदर्भात मंत्री मुश्रीफ यांनी तातडीने लक्ष घालत कार्यवाही करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना दिल्या होत्या. याबाबतचा पाठपुरावा श्री. शिंत्रे यांनी उपाधीक्षक अभियंता यांच्याकडे केला होता. या प्रश्नासाठी  वेळोवेळी जन आंदोलन करून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निवेदन देत अधीक्षक अभियंता यांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर याची कार्यवाही करण्यासाठी हे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.





कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे उपाधीक्षक अभियंता यांनी पत्रात म्हटले आहे की, श्री. अमृत गुंडू शिंत्रे, यांनी कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) कोल्हापुर हा विभाग गडहिंग्लज पाटबंधारे उपविभाग, गडहिंग्लज येथील संपादित केलेल्या ठिकाणी वरील विभाग स्थलांतरीत होणेबाबत विनंती केली आहे. अशा आशयाचे पत्र मंडळ कार्यालयास प्राप्त झालेले असून सोबत नामदार हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र सादर केलेले आहे.




नामदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) कोल्हापुर हा विभाग गडहिंग्लज येथे स्थलांतरीत होणेबाबत त्यांच्या विनंती अर्जाप्रमाणे पुढील योग्य ती कार्यवाही करणेकामी सहकार्य करावे असे सुचित केलेले आहे. तसेच यापूर्वी देखील आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे पत्रानुसार संदर्भ क्रं. ३ व ४ अन्वये आपल्या कार्यालयाचा समर्पक अनुपालन अहवाल सादर करण्यास कळविलेले होते तो अद्याप या कार्यालयास प्राप्त झालेला नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे. वरील संदर्भिय पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविणेत येते की, आपल्या विभागांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची नांवे व सदर प्रकल्पांचे गडहिंग्लजपासूनचे अंतर याबाबतची सविस्तर माहिती नकाशासह सादर करण्यात यावी. वरील संदर्भिय पत्र आपले अवलोकनी घेवून त्याबाबतचा समर्पक अनुपालून अहवाल मंडळ कार्यालयास तात्काळ सादर करावा. असे पत्रात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.