Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बारावी परीक्षेत यंदाही मुलींचीच बाजी

बारावीचा राज्याचा ९३.३७ टक्के निकाल


यंदा देखील कोकण विभागच अव्वल, मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल 


कोल्हापुर विभाग निकालात चौथ्या स्थानी  





पुणे : इयत्ता बारावीचा राज्याचा एकूण निकाल ९३.३७ टक्के इतका लागला आहे. यंदा देखील निकालात कोकण विभागच अव्वल ठरला असून नाशिक विभाग द्वितीय, पुणे विभाग तृतीय तर कोल्हापुर विभाग चौथ्या स्थानी, छत्रपती संभाजी नगर पाचव्या स्थानी, अमरावती सहाव्या स्थानी, लातूर सातव्या स्थानी, नागपूर आठव्या स्थानी  तर मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल लागला असून नऊव्या स्थानी आहे. निकालात यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात 2.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील एकूण 2246 महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऑनलाइन निकाल दुपारी एक वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.



राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये पुणे 94.44, नागपूर 92.12, छत्रपती संभाजी नगर 94.08, मुंबई 91.95, कोल्हापूर 94.24, अमरावती 93, नाशिक 94.71, लातूर 92.36, कोकण 97.51 टक्के इतका निकाल लागला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.