Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दहावीचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार



पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७ मे २०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची प्रतीक्षा संपली आहे.  



निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल -


१. https://mahresult.nic.in


२. http://sscresult.mkcl.org


३. https://sscresult.mahahsscboard.in


४. https://results.digilocker.gov.in


५. https://results.targetpublications.org


६. https://www.tv9marathi.com


माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.


https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.


तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.